Flight Bomb Threat: रशियन एरोफ्लॉट एअरलाईन्सच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, विमानचं दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
Charter plane | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

रशियन एरोफ्लॉट एअरलाईन्सच्या (Russian Aeroflot Airlines) विमानाला काल बॉम्बने (Bomb Threat) उडवण्याची धमकी देण्यात आली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) गुरुवारी रात्री फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची ई-मेल (Email) सूचना मिळाली. तरी सुचना मिळताचं संबंधीत मॉस्कोहून (Moscow) आलेल्या एका विमानाचे 400 जणांना घेऊन दिल्लीत आपत्कालीन लँडिंग (emergency Landing) करण्यात आले. रशियन वाहक एरोफ्लॉटद्वारे संचालित बोईंग 777 विमानाच्या लँडिंगसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. एरोफ्लॉट विमान SU 232 पहाटे 2.48 वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport Delhi) उतरले. विमानाचं लॅंडिंग झाल्यानंतर प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना ताबडतोब सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

तथापि, सुरक्षा कर्मचार्‍यांना अद्याप विमानात बॉम्ब सापडलेला नाही तरी अजुनही संपूर्ण सखोल तपास सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.गेल्या काही आठवड्यांमध्ये फ्लाइट्सवर बॉम्बच्या धमकीच्या किमान दोन घटना घडल्या आहेत. 3 ऑक्टोबर रोजी, भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करणार्‍या चीनकडे जाणार्‍या इराणी नागरी विमानावर बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. पण नंतर संबंधीत विमानाची चीनमध्ये सुरक्षित लॅंन्डिंग करण्यात आली. (हे ही वाचा:- Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशिदीप्रकरणी आज महत्वपूर्ण सुनावणी, होणार शिवलिंग बाबत फैसला)

 

त्यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी, IGIA येथे विमानात बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये भांडण झाल्यानंतर बॉम्बच्या खोट्या अलार्ममुळे मलेशियाला जाणारे विमान उशीर झाले होते. तरी या घटनेत सहभागी असलेल्या चार प्रवाशांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या काही दिवसांत अशा प्ररकारच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येते तरी या धमक्यांमागे नेमक दडलयं कोण ह्याचा तपास आंतरराष्ट्रीय पातळीवर केल्या जात आहे.