हनुमानजी मुसलमान असल्याचे भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान
BJP lawmaker Bukkal Nawab. | Image Courtesy: PTI

भाजप आमदार बुक्कल नवाब (Bukkal Nawab) यांनी भगवान हनुमान मुसलमान असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. हनुमानजी सर्व धर्माचे होते आणि ते सर्व धर्मातील लोकांना प्रिय होते. पण हनुमानजी मुसलमान होते, असे आमचे मानणे आहे. त्यामुळेच रहमान, झीशान, फरमान, रमजान अशी नावे आमच्याकडे ठेवली जातात. हनुमान यांच्या नावावरुनच ही नावे ठेवली जात असल्याचे भाजप आमदार बुक्कल नवाब यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानजी दलित असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भगवान हनुमान यांच्या जातीवरुन सुरु असलेला हा वाद नवाब यांच्या विधानामुळे अधिकच वाढण्याची शक्यता आहे.