मोहन लाल खट्टर | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Manohar Lal Khattar Resigns as CM of Haryana: लोकसभेच्या जागांवर दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाशी (JJP) भाजपची युती तुटल्याने मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये भाजपशी युती केलेल्या जेजेपीने लोकसभेच्या दोन जागांसाठी जोर लावला होता, परंतु भाजपला सर्व 10 संसदीय जागा लढवायच्या होत्या. जेजेपीला लोकसभा निवडणुकीत हिस्सार आणि भिवानीमधून निवडणूक लढवायची होती. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर हरियणा राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

नायब सैनी यांची मुख्यमंत्री पदी निवड होण्याची शक्यता

जननायक जनता पक्षासोबतचे संबंध तुटण्याची शक्यता असताना भाजप नेतृत्व हरियाणा सरकारमध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आगोदरच निर्माण झाली होती. भाजप विधिमंडळ पक्षाची एक बैठक लवकरच पार पडणार आहे. प्राप्त माहितीनुसार, बिगर-जाट असलेले नायब सैनी यांची मुख्यमंत्री पदी निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर लाल खट्टर कर्नालमधून निवडणूक लढवू शकतात. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: विद्यमान भाजपा खासदारांचा पत्ता कट? राजकीय वर्तुळातच चर्चा, यादीही व्हायरल)

हरियाणा विधानसभेतील पक्षीय बलाबल

हरियाणा विधानसभेच्या 90 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे 41, काँग्रेसचे 30 आणि जेजेपीचे 10 आमदार आहेत. सात अपक्ष आहेत, तर इंडियन नॅशनल लोक दल (INLD) आणि हरियाणा लोकहित पार्टी (HLP) यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. सहा अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की जेजेपीचे 4-5 आमदारही भाजपच्या संपर्कात आहेत. या आमदारांच्या बाजूने भाजप नवीन सरकार स्थापन करण्यासाठी 46 चा बहुमताचा आकडा आरामात पार करेल, असा भाजपला विश्वास आहे. भाजप सहा अपक्ष आणि हरियाणा लोकहित पक्षाच्या (एचएलपी) एक आमदारांसह नवीन सरकार स्थापन करू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा आहे. भाजपने केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि पक्षाचे नेते तरुण चुग हरियाणाला निरीक्षक म्हणून पाठवले आहेत. (हेही वाचा, ED Action Against Rohit Pawar: '...आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू'; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खट्टर यांच्या राजीनाम्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. सांगितले जात आहे की ते कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यासह केंद्रीय भाजप नेते या बदलांवर देखरेख करण्यासाठी निरीक्षक म्हणून पक्षातर्फे राज्यात दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जागावाटपाचा करार होऊ न शकल्याने भाजप आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपी यांच्यातील संबंध बिघडले आहेत, या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने राज्यातील सर्व 10 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या.