Haryana Assembly Elections 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Elections 2024) भाजप (BJP) चे अनेक बंडखोर नेते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत भाजपने बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाविरोधात निवडणूक लढविणाऱ्या आठ कार्यकर्त्यांची भाजपने हकालपट्टी (BJP Expels Eight Leaders) केली आहे. यामध्ये रणजित सिंह चौटाला (Ranjit Singh Chautala) यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रत्येकाची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपने हकालपट्टी केलेल्या नेत्यांमध्ये लाडवा येथील संदीप गर्ग, असंध येथील जिलेराम शर्मा, गन्नौर येथील देवेंद्र कादियान, सफिडॉनमधील बच्चन सिंग आर्य, रानिया येथील रणजीत चौटाला, मेहममधील राधा अहलावत, गुरुग्राममधील नवीन गोयल आणि हाथिनमधील केहर सिंग रावत यांचा समावेश आहे. (हेही वाचा -Haryana Assembly Election 2024: काँग्रेसने 34 उमेदवार केले निश्चित, 22 विद्यमान आमदारांच्या नावांचाही समावेश; 'या' जागेवरचा पेच कायम)
मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री असलेले रणजित सिंह चौटाला यांना पक्षाने (भाजप) तिकीट नाकारले होते. यानंतर त्यांनी रानियामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. भाजप आणि आरएसएसच्या सर्वेक्षण अहवालात रणजीत चौटाला यांचा रिपोर्ट चांगला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचे तिकीट रद्द होऊ शकते, असे मानले जात होते. (हेही वाचा - Haryana Assembly Elections 2024: कुस्तीपटू Vinesh Phogatने विधानसभा निवडणूकीसाठी भरला उमेदवारी अर्ज (Watch Video))
भाजपच्या आठ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी -
Haryana BJP expels 8 leaders from the party for 6 years for contesting the upcoming Haryana assembly elections as independent candidates against the party candidates.
The list includes the names of former minister Ranjit Chautala and former MLA Devendra Kadyan. pic.twitter.com/Aq7YeUTDzT
— ANI (@ANI) September 29, 2024
हरियाणाच्या विधानसभेच्या 90 जागांवर एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 8 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हरियाणा विधानसभेच्या शेवटच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्षाच्या युतीने राज्य सरकार स्थापन केले.