अरबी समुद्रामध्ये घोंघावणार्या बिपरजॉय चक्रीवादळाने (Biparjoy Cyclone) आता अजून रौद्र रूप धारण केले आहे. तौक्ते नंतर आता हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली वादळ म्हणून पाहिलं आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने किनारपट्टीच्या भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील राज्यांना हा इशारा देण्यात आला आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी दुपारी मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
दक्षिण अरबी समुद्राच्या नजिकच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पुढील 24 तासांत उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने पुढील प्रवास करेल असा अंदाज आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी वर यामुळे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो. येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमार्यांनीही समुद्रामध्ये जाऊ नये. Cyclone Biparjoy चा मुंबईत प्रभाव; गिरगाव चौपाटीवर जोरदार वारं ते रेल्वे सेवा विस्कळीत (Watch Video) .
११/०६:अरबी समुद्रावरील बिपरजॉय अत्यंत तीव्र चक्री वादळ झाले:सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला चक्रीवादळ इशारा (पिवळा संदेश):
सकाळी 5.30 वा मुंबईपासून 580किमी
सौराष्ट्र-कच्छ व लगत पाकिस्तानच्या किनारपट्टीला १५/०६ दुपारी मांडवी-कराची दरम्यान ओलांडण्याची शक्यता;वारे 125-135kmph-150 kmph
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023
'बिपरजॉय' चक्रीवादळ पुढील 12 तासांत अत्यंत रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. दरम्यान हे चक्रीवादळ पाकिस्तानमध्ये आदळण्याची शक्यता आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ भारतातील गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून पुढे सरकणार असल्याचा अंदाज आहे.