Bihar Police: कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना मोबाईल बंदी; बिहार पोलीस मुख्यालयाचे आदेश
Bihar Police | (File Image)

बिहार पोलीस (Bihar Police) दलात कर्तव्यास असलेले पोलिस कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांना मोबाईल फोन (Mobile Phones) वापरास मानाई करण्यात आली आहे. बिहारच्या पोलीस महासंचालकांनी हे आदेश जारी केले आहेत.[Poll ID="null" title="undefined"]

सातत्याने येणाऱ्या तक्रारी आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले बिहार पोलिसांचे व्हिडिओ पाहून बिहार पोलीस मुख्यालयाने हे आदेश जारी केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, व्हीआयपी सुरक्षा, वाहतूक पोलीस आणि चौकांमध्ये कर्तव्यास असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करता येणार नाही.

बिहार पोलीस महानिदेशकांकडून जारी आदेशात म्हटले आहे की, अनेक वेळा असे निदर्शनास आले आहे की, कर्तव्यावर असतानाही अनेक कर्मचारी मोबाईल फोनवर असतात. अनेकदा ते मोबाईलवर खेळ खेळतात अथवा सोशल मीडियाशी संबंधीत मनोरंजन करतात. त्यामुळे पोलिसांचे आपल्या कर्तव्यापासून लक्ष विचलीत होते. त्यांची कार्यक्षमता कमी होते. यासोबत कर्तव्यात कसूर आणि सेवेप्रती कमी झालेली निष्ठाही दिसते. ज्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होते. (हेही वाचा, धक्कादायक! बिहार मध्ये जानेवारी- सप्टेंबर महिन्यापर्यंत दर दिवसाला 4 रेप किंवा सामूहिक बलात्काराचे गुन्हे दाखल)

एएनआय ट्विट

बिहार पोलिसांना दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, पोलीस दलातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे कर्तव्यावर असताना कोणत्याही प्रकारे फोन वापरणार नाहीत. केवळ अत्यावश्यक स्थितीतच त्यांना मोबाईल फोनचा वापर करण्याची परवागी असेल. अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.