Baby crying | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

बाळ म्हटलं की ते रडणारंच. उलट ते नाही रडलं तरंच नवल. विचित्र आणि विक्षिप्त स्वभावाच्या आईला हे कसं कळणार. नवजात बाळ सातत्याने रडते (Baby Crying) आणि त्याच्या रडण्याचा आवाज असहय्य होतो म्हणून चक्क त्याच्या ओठाला फेवीक्विक (Feviquick) लावण्यात आले. जेणेकरुन त्याचे ओठ घट्ट चिकटले जातील आणि त्याचे रडणे थांबेल. विशेष म्हणजे जन्मदात्या आईनेच हे खळबळजनक कृत्य केले आहे. बिहार (Bihar) राज्यातील कटिहार (Katihar) जिल्ह्यात कदवा पोलीस ठाणे हद्दीतील सोनौली गावात ही घटना घडली.

फेवीक्विक लावल्याने या नवजात बाळाचे ओठ काही क्षणांतच एकमेकांना घट्ट चिकटले. आईचा हा विक्षिप्तपणा ध्यानात आल्यावर नातेवाईकांनी बाळाला उपचारासाठी दवाखान्यात नेले. बाळाची अवस्था आणि घडलेला प्रकार पाहून उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. प्राप्त माहितीनुसार पीडित बाळ हे बिहार राज्यातील कटिहार येथील कदवा पोलीस ठाणे हद्दीतील सोनौली गावाचे आहे. 'न्यूज 18' ने दिलेल्या वृत्तानुसार या बाळाची आई बाळाच्या रडण्याला वैतागली होती. त्यामुळे तिने थेट बाळाचे ओठच चिकटविण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांना घटनेची माहिती कळताच त्यांनी बाळाला रुग्णालायात उपचारासाठी तातडीने दाखल केले. बाळाला सनौली येथील उप आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन बाळाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले.

बाळाच्या रडण्याचा आवाज बंद

पीडित बाळाचे वडील दुलारचंद महाल्दार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, घटना घडली त्या दिवशी सकाळी ते कोणा एका परीचिताला सोडण्यासाठी स्टेशनवर गेले होते. ते घरी परतले तेव्हा घराचा दरवाजा बंद दिसाल आणि घराच्या आतूनही कोणताही आवाज येत नव्हता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर पत्नी शोभा देवी यांनी दरवाजा उघडला. दुलारचंद यांनी घरात प्रवेश करुन बाळाकडे पाहिले तर ते पलंगावर शांत पहूडले होते. (हेही वाचा, विकृत नवऱ्याच्या सुखाची तृप्ती करण्यासाठी क्रूर आईने 4 महिन्यांच्या बाळाची 28 हाडे तोडली)

पत्नीचे कृत्य पतीसोबत कुटुंबीयही अवाक

पुढे बोलताना पीडित बाळाच्या वडील दुलारचंद महाल्दार यांनी सांगितले की, मी जवळ जाऊन पाहिले तर, बाळाच्या तोंडाला काहीतरी लागल्याचे जाणवले. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांना वाटले की, त्याच्या तोंडाला फेस आला असावा. त्यांनी पाण्याने तो पुसण्याचा प्रयत्न केला. पण तो जात नव्हता. मग त्यांनी माता शोभा देवी यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, बाळ खूप रडत होते. म्हणून मी त्याच्या तोंडाला फेवीक्विक लावले आहे. आता पाहा ते कसे शांत झाले आहे. बायकोचा हा प्रताप पाहून दुलारचंद आणि त्यांचे कुटुंबीयांची बोबडीच वळली. त्यांनी तातडीने बाळाला घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्यास्थितीत बळावर आवश्यक ते उपचार झाले असून, त्याची प्रकृतीही ठिक आहे.