
प्रसिद्ध सनई वादक दिवंगत भारत रत्न उस्ताद बिस्मिल्लाह खां (Shehnai Maestro Ustad Bismillah Khan) यांचे वाराणसी (Varanasi) येथील घर पाडण्यात आले आहे. हे घर वाराणसी येथील बेनिया बाग येथे होते. तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्यासाठी हे घर पाडण्यात आले (Bismillah Khan House Demolished) आहे. हे घर 1936 मध्ये खरेदी करण्यात आले होते. याच घरात बिस्मिल्लाह खां (Bismillah Khan)) यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते. त्यांच्या शिष्यांनी त्यांना अनेकदा अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याचा सल्ला आणि प्रस्तावही दिला होता. मात्र खां साहेबांनी तो नेहमीच नाकारला होता. बिस्मिल्ला खान यांना 2001 मध्ये भारत रत्न (Bharat Ratna) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
खां साहेबांच्या घराची मालकी सध्या बिस्मिल्लाह खां यांचे नातू आणि दिवंगत मुलगा हुसैन यांच्याकडे आहे. मेहताब हे बिस्मिल्लाह यांच्या पाच मुलांपैकी एक होते. त्यांचा एक नातू सुफी याने सांगितले की, आर्थिक टंचाईतून घर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढे बोलताना सुफी यांनी सांगितले की, या ठिकाणी एक तिन मजली व्यावसायिक इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या एका भागात बिस्मिल्लाह खां यांचे संग्रहालय उभारण्यात येईल. या ठिकाणी बिस्मिला खां यांच्या सर्व वस्तू, पुरस्कार, ध्वनिमुद्रिका, ध्वनिचित्रफिती अशा सर्व गोष्टी संग्रहीत करण्यात येतील. (हेही वाचा, Bharat Ratna 2019: प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देखमुख यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान)
बिस्मिल्लाह खां यांच्या शिष्या राहिलेल्या आणि त्यांच्या दत्तक कन्या गायिका सोमा घोष यांनी म्हटले आहे की, खां साहेबंचे घर पाडण्याचा कुटुंबीयांचा निर्णय ऐकून धक्का बसला. बाबांचे (खां) घर पाडण्यात आले आहे हे ऐकून मला मोठा धक्का बसला. त्यांचे सर्व सामना बाहेर फेकण्यात आल्याचे मला समजले. ती इमारत केवळ एक घर नव्हते तर संगीत प्रेमींचे साधना करण्याचे ते एक ठिकाण होते. हा एक अमूल्य ठेवा आहे. तो जपून ठेवण्याचे मी अवाहन करते अशीही भावना गायिका सोमा घोष यांनी व्यक्त केली आहे.