Bharat Bandh: कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक, आंदोलनाला 10 महिने पूर्ण
Bharat Bandh (Photo Credits-ANI)

Bharat Bandh: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशातील काही राजकीय पक्षांनी सुद्धा समर्थन दिले आहे. बंद पाहता दिल्लीत कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आंदोलनकर्त्यांना दिल्लीत येण्यास परवानगी नसणार आहे. एका बाजूला शेतकऱ्यांकडून तीन कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकार याबद्दल बातचीत करण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भारत बंद संबंधित असे म्हटले, शेकतकऱ्यांना आग्रह करतो की आंदोलनाचा मार्ग सोडून वार्ताचा मार्ग पकडा. सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या कृषी विधेयकावर विचार करण्यास तयार आहोत. यापूर्वी सुद्धा काही वेळा बातचीत झाली आहे. आणखी काही बोलायचे असेल तर सरकार जरुर बातचीत करेल.(पंतप्रधान Narendra Modi यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनाला केले संबोधित, पाहा व्हिडिओ) 

Tweet:

दरम्यान, गेल्या 10 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन तीव्र झाल्याचे सुद्धा दिसून आले होते. तर आज पुन्हा भारत बंदची हाक देण्यात आली असून सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. रुग्णालय, मेडिकल स्टोर आणि अन्य प्रकारच्या सेवांना यामधून सूट दिली जाणार आहे. परंतु शासकीय, खासगी कार्यालये, दुकाने बंद राहणार आहेत.

Tweet:

या आंदोलनाला राजकीय पक्षांनी सुद्धा समर्थन दिले आहे. आंदोलनकर्त्यांना दिल्लीत घुसण्याची परवानगी नसणार आहे. तर पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी असे म्हटले की, भारत बंदची स्थिती लक्षात घेता सुरक्षिततेसंबंधित व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सीमेवरील परिसरात सुद्धा कठोर सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे.