पंजाबमध्ये नव्यानेच सत्तेवर आलेले आम आदमी पक्षाचे सरकार (AAP Government) सक्रीय झाले आहे. पंजाबमध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार (Corruption ) मोडीत काढण्यासाठी एक मोहिमच सुरु केल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी केली आहे. या मोहिमेसाठी एक भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन सुरु करणार असल्याचे मान यांनी म्हटले आहे. भगवंत मान यांनी कालच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले की, 'आता एक दिवसही वाया घालवणार नाही.' भ्रष्टाचाराविरोधात येत्या 23 मार्च रोजी भगतसिंह यांच्या जयंतीदिनी एक हेल्पलाईन नंबर जारी केला जाईल.
ट्विटरच्या माध्यमातून भगवंत मान यांनी सांगितले की, भ्रष्टाचार विरोधी क्रमांक हा माझा खासगी नंबर असेल. जर कोणी लाच मागत असेल तर त्या नंबरवर ऑडिओ किंवा व्हिडिओ पाठवा. मी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला धमकी देत नाही. कारण एकूण प्रशासनातील 99% सरकारी कर्मचारी इमानदार आहेत. केवळ 1% कर्मचारी भ्रष्ट आहेत. त्यांनी संपूर्ण सिस्टम खराब करुन टाकली आहे. केवळ 'आप'च या व्यवस्थेला बदलू शकतात. (हेही वाचा, Punjab Elections Results 2022: पंजाबमध्ये AAP ने मारली बाजी, काँग्रेसचा पत्ता कट; हे मुद्दे ठरले निर्णायक)
मुख्यमंत्री मान यांनी म्हटले की, 'येणाऱ्या काळात आम्ही एक असा हेल्पलाईन क्रमांक जारी करत आहोत. जो माजा खासगी नंबर असेल. जर आपणास कोणी लाच मागत असेल तर त्याचा केवळ एक ऑडिओ किंवा व्हिडिओ माझ्याकडे पाठवा. मी आपल्याला विश्वास देतो की आमचे कार्यालय यावर नक्की विचार करेन. कोणीही भ्रष्टाचारी आता वाचणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई होईल.'
भगवंत मान ने कहा कि हेल्पलाइन नंबर स्वतंत्रता सेनानी शहीद भगत सिंह की पुण्यतिथि पर 23 मार्च को जारी किया जाएगा. मुख्यमंत्री ने कहा कि यह पंजाब के इतिहास में एक बड़ी घोषणा होगी.