Bengaluru Shocker: बेंगलूरू मध्ये पत्नीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न मिळाल्याने झोपेत असलेल्या पतीवर केले चाकू हल्ले!
हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

लग्नाच्या वाढदिवसाला (Wedding Anniversary Gift) पतीने गिफ्ट न दिल्याच्या रागामध्ये गृहिणी असलेल्या पत्नीने आपल्या नवर्‍याच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पती झोपेत असताना त्याला मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना बेंगलूरू (Bengaluru) मधील आहे. Bellandur Police Station मध्ये आरोपी पत्नी विरूद्ध खूनाच्या प्रयत्नाचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 37 वर्षीय पती किरण ( बदललेलं नाव) याला जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. पती एका खाजगी कंपनी मध्ये कामाला आहे.

किरणने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये त्याच्यावर पत्नीने 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हल्ला केला. तो झोपेत असताना स्वयंपाकघरातील सुरीच्या मदतीने तिने हातावर वार केले. पत्नीकडून अधिक हल्ला होण्याआधीच त्याने घरातून पळ काढला. पत्नी ढकलून देत त्याने शेजार्‍यांची मदत घेतली आणि हॉस्पिटल गाठले. हा हल्ल्याचा प्रकार असल्याने हॉस्पिटलने तातडीने पोलिसांना सारा प्रकार कळवला. नक्की वाचा: Viral Video: पती-पत्नीमध्ये झाले भांडण; पलंगावर बांधली विटांची भिंत, पहा व्हायरल व्हिडिओ .

TOI च्या वृत्तानुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये आरोपी पत्नी विरूद्ध 1 मार्च दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला चौकशीला बोलावण्यात आले. हा घरगुती प्रश्न असल्याने त्या जोडप्याला काही वेळ देऊन गोष्टी सोडवण्याचा सल्ला देण्यात आला. तपासामध्ये पोलिसांना समजले की पती किरणने त्याच्या आजोबांचं निधन झाल्याने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाआधी कोणतेही गिफ्ट आणले नाही. पहिल्यांदाच पतीकडून भेटवस्तू न मिळाल्याने ती रागावली होती. किरणला पत्नी काही खाजगी कारणांमुळे अस्थिर असल्याचा अंदाज होता तो तिला काऊन्सलिंगला देखील घेऊन जाणार होता.