बेंगळुरू मेट्रोच्या एका सुरक्षा रक्षकाने स्टेशन प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूस उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशाकडे “सतत टक लावून पाहत” हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना ही घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत सदर महिलेने कारवाई करण्याची मागणी ही केली आहे.  जलाहल्ली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली असून  मेट्रो प्राधिकरणाकडे केलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, "सुरक्षा रक्षक सतत माझ्याकडे एकटक पाहत होता आणि आपल्या प्रायव्हेट पार्टवरुन हात फिरवत काही हातवारे करत होता".  (हेही वाचा - Bengaluru: शेजारच्या इमारतीत जोडप्याने 'ओपन-विंडो रोमान्स' केल्यामुळे महिलेने पोलिसांकडे केली तक्रार)

सदर महिलेने तक्रार केली आहे की दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडल्याने ही फारच धक्का दायक आहे. तसेच सदर महिलेने त्या सुरक्षा रक्षकास विचारण्याचा प्रयत्न केल्या नंतरही तो पाहतच राहिला. यानंतर महिलेने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केल्यावर तो त्या ठिकाणाहून बाजूला झाला.  या घटनेनंतर याची तक्रार महिलेने मेट्रो प्राधिकरणाकडे केली त्यानंतर त्यांचा काही प्रतिसाद आला नाही म्हणून पोलिसांत देखील तक्रार केली.

पाहा व्हिडिओ -

मंगळवारी, मोहित बिश्नोई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने महिलेच्या दोन्ही तक्रारींचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आणि आरोप केला की मेट्रो प्राधिकरणाने तिच्या कारवाईच्या विनंतीकडे "दुर्लक्ष" केले.