Bengaluru Violence (Photo Credits: ANI)

कर्नाटक (Karnataka) मधील बंगळुरु (Bengaluru) येथे मंगळवारी (11 ऑगस्ट) रात्री सोशल मीडिया पोस्टवरुन एकच हिंसाचार उसळला. बंगळुरु पोलिस आयुक्त कमल पंत (Kamal Pant) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवीन याला अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पोलिस जखमी झाले आहेत.  संतप्त जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मुर्ति (Congress MLA Srinivas Murthy) यांच्या घरावर हल्ला करत दगडफेक केली. काही वाहनांचीही तोडफोड केली. यावेळी परिसरात आगही लावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. दरम्यान 110 जणांना अटक करण्यात आली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जमावाने पोलिस ठाण्याबाहेर एकत्र येत एफआयआर दाखल करत गुन्हेगाराला तातडीने अटक करण्याची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला. तसंच परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी बंगळुरु मध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसंच DJ Halli आणि KG Halli पोलिस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

ANI Tweet:

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, जमीयत उलामा-हिंद यांचे धार्मिक गुरु मुफ्ती पीएम मुजम्मिल यांनी निदर्शकांना संबोधित केले आणि त्यांना हिंसाचारापासून परावृत्त होण्याचे मार्गदर्शन केले. दरम्यान या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलिस गुन्हेगाराला अटक केलं आहे. त्याला योग्य ती शिक्षा देखील होईल. मात्र सर्वांनी आपल्या भावना नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.