उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या कॅनडाच्या गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट देण्यासाठी चक्क बँक लुटण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाला गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट देऊन इम्प्रेस करायचे होते. मात्र त्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यानंतर त्याने बँकेतून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. अहवालानुसार, छाया स्क्वेअरजवळील इंदिरा मार्केटमध्ये असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे दरवाजे तोडून लॉकर ग्राइंडरने कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी सकाळी बँकेत पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांनी हे चित्र पाहिले असता घबराट पसरली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तासांत आरोपीला पकडले.
शहरातील छाया चौकाजवळील पालिकेच्या इंदिरा मार्केटच्या दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर पंजाब नॅशनल बँक चालते. दिवाळीनिमित्त चार दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी कर्मचारी बँकेत पोहोचले असता त्यांना मुख्य दरवाजासह बाजूचा दरवाजा तुटलेला दिसला. भिंतीवरून प्लॅस्टरही खाली पडले होते. आत गेल्यावर मुख्य लॉकर कापण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे दिसले.
माहिती मिळाल्यानंतर एएसपी नॉर्थ चिरंजीव नाथ सिन्हा, सीओ सिटी सुमित कुमार त्रिपाठी, सीओ सदर हर्षित चौहान, कोतवाल आलोक कुमार त्रिपाठी, सात्रीख आणि देवा पोलीस स्टेशनचे प्रभारी, गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. एसपी दिनेश कुमार सिंह यांनी तातडीने पाच पथके तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी बँकेत लावलेल्या तसेच इतर 70 दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. (हेही वाचा: Gwalior: दोन सख्ख्या भावांचे एकाच मुलीवर जडले प्रेम; तिच्या मेकअप आणि कपड्यांच्या खर्चासाठी करू लागले चोरी, पोलिसांकडून अटक)
प्रेयसीसाठी महागड्या भेटवस्तू देण्यासाठी व्यक्तीने केला बँक लुटण्याचा प्रयत्न-
कनाडा में रहने वाली इंस्टाग्राम गर्लफ्रेण्ड को महंगे उपहार देने के लिए की गयी पीएनबी बैंक में चोरी के प्रयास की घटना का 03 घण्टे के अन्दर सफल अनावरण व गिरफ्तारी के सम्बन्ध में अपर पुलिस अधीक्षक उत्तरी की बाइट-#barabankipolice #UPPolice@Uppolice@adgzonelucknow@igrangeayodhya pic.twitter.com/SmW8deuBcj
— Barabanki Police (@Barabankipolice) November 4, 2024
अखेर बँकेत बसवण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्यात बँकेत घुसलेल्या तरुणाचा अस्पष्ट चेहरा दिसून आला. पोलिसांच्या तांत्रिक पथकाने आणि तज्ञांनी त्याचा चेहरा स्पष्ट केला आणि बेगमगंजचा रहिवासी शाहिद खान उर्फ अब्दुल समद अशी त्याची ओळख पटवली. दुपारीच पोलिसांनी शाहिदला पकडले. त्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला. आरोपीने सांगितले की त्याच्या तीन गर्लफ्रेंड्स आहेत व त्यापैकी एक कॅनडामध्ये राहतो. तो तिच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधतो. या गर्लफ्रेंडला भेट देण्यासाठी त्याने बँक लुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. येथून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.