Nimbu Pani via UPI: ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका लिंबूपाणीच्या स्टॉलवर उभे असल्याचे दिसत आहे. ते केवळ उभे नाहीत तर लिंबूपाणीच्या स्टॉलवर ते लिंबूपाणीही पितात. त्यांनी UPI द्वारे लिंबूपाणीचे पैसे दिले. जे त्यांच्या सोबतच्याअधिकाऱ्यानी जमा केले. व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स हे UPI पेमेंट काळजीपूर्वक पाहत आहेत आणि समजून घेत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “UPI द्वारे लिंबू पाणी. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी भारताच्या अतुलनीय डिजिटल इनोव्हेशनची प्रशंसा केली.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)