India-China Violent Face-Off in Ladakh: गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य दलाचे जवळजवळ 20 जवान शहीद; चीनचे 40 जवान जखमी, त्यातील काही ठार झाल्याचे वृत्त- Reports
Indian & Chinese Troops | Representational Image | (Photo Credits: IANS)

मंगळवारी रात्री पूर्व लडाखच्या (Eastern Ladakh) गलवान खोऱ्यामध्ये (Galwan Valley) चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत , 20 भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. न्यूज एजन्सी एएनआयने (ANI) सरकारी सूत्रांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. यासोबतच चीनचीही बरीच हानी झाली आहे. चीनचे जवळजवळ 40 जवान जखमी झाले आहेत तसेच त्यातील काही ठार झाल्याचेही वृत्त मिळत आहे. सुरुवातीला कर्नलसह तीन सैनिक शहीद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. 1962 नंतर प्रथमच लडाख भागात सैनिक शहीद झाले आहेत. सध्या भारत व चीनममधील तणावाच्या परिस्थितीबाबत दिवसभर उच्चस्तरीय बैठका सुरू होत्या.

एएनआय ट्वीट -

सोमवारी रात्री गलव्हान खोऱ्याजवळ उभय देशांमध्ये चर्चेनंतर परिस्थिती सामान्य होत असताना, ही घटना घडली आहे. आतापर्यंत, भारतीय सैन्य दलातील तीन जवानांची ओळख पटली आहे, ज्यामध्ये- तेलंगानाचे कर्नल संतोष बाबू, तामिळनाडूचे हवालदार पलानी राजू आणि झारखंडचे सिपॉय ओझा- जे चीनच्या सैन्यासह चकमकीत शहीद झाले. दरम्यान, या दोन्ही देशातील तणाव दूर करण्यासाठी चर्चा सुरु आहे. (हेही वाचा: Galwan Valley: 1962 मध्ये सुद्धा गलवान व्हॅली भागात चीन ने भारताला दिला होता धोका, आज झाली पुनरावृत्ती, वाचा सविस्तर)

गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासह झालेल्या झटापटी दरम्यान, जखमी झालेल्या सैनिकांना मदत करण्यासाठी LAC ओलांडून चिनी हेलिकॉप्टरची ये-जा सुरु झाली असल्याची माहितीही भारतीय लष्कराने दिली आहे. या घटनेनंतर गलवान परिसरातून भारतीय आणि चिनी सैन्य डिसएंगेज झाले आहे. यापूर्वी 15/16 जून रोजी रात्री या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये झटापट झाली होती. त्यावेळी लाईन ऑफ ड्युटी जवळ कर्तव्य बजावत असलेले 17 भारतीय सैनिक जखमी झाले होते. लडाखच्या अति उंचीच्या प्रदेशात, सब-शून्य तापमान असताना जखमा बऱ्या न झाल्याने काही जवान शहीद झाले.