Assembly Elections 2024 Exit Poll : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांनंतर आता मतदारांना निकालाची प्रतीक्षा आहे. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांवर शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. याआधी 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात आणि 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं होतं. कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले, त्यामुळे मतदारांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. तर हरियाणात 5 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात सर्व 90 जागांसाठी मतदान झाले आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला येतील, मात्र त्याआधी एक्झिट पोलचे निकाल आज (शनिवार) म्हणजेच 5 ऑक्टोबरला येतील. एक्झिट पोलमध्ये विजय-पराजयाचा अंदाज येईल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, हरियाणामध्ये मतदान संपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून एक्झिट पोलचे निकाल लाइव्ह होतील. त्यासाठी सर्व सर्वेक्षण संस्थांनी आपापली तयारी केली आहे.

येथे पाहू शकता

एक्झिट पोल लाइव्ह कुठे बघायचा?

आजतकच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल थेट पाहू शकता. याशिवाय, निवडणुकांशी संबंधित ताज्या बातम्याही LatestLY वर वाचता येतील.