Assembly Election 2021 Exit Poll Result Live Streaming: विधानसभा निवडणूक News18 ​एक्झिट पोल्स रिझल्ट लाईव्ह स्ट्रिमिंग इथे पाहा
Exit Poll Results 2021 | Photo Credits: PTI

देशात पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), आसाम (Assam) आणि पुद्दुचेरी (Puducherry) या पाच महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. 27 मार्च पासून सुरु झालेल्या या निवडणूकांचा आज अखरेचा टप्पा पार पडला. 2 मे रोजी या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. तत्पूर्वी आज विविध वृतवाहिन्या एक्झिट पोलद्वारे जनमताचा कौल नेमका कोणत्या पक्षाला असेल, याचा अंदाज बांधतील.  News18 चे विधानसभा निवडणूकीचे एक्झिट पोल्स लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही येथे पाहू शकता.

पश्चिम बंगाल मध्ये एकूण 294 जागांवर 8 टप्प्यात मतदान झाले. आसाममध्ये तीन टप्प्यात 126 जागांवर मतदान पार पडले. तामिळनाडू मध्ये 234, केरळ 140 आणि पद्दुचेरी येथे 30 जागांवर केवळ एका टप्प्यात मतदान झाले आहे.

News18 चे एक्झिट पोल्स येथे पहा:

सध्या तामिळनाडूमध्ये सध्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (ADMK) पक्षाचं सरकार आहे. यंदाच्या निवडणूकीत भाजप, काँग्रेस यांच्यासोबतच अन्य स्थानिक पक्षांमध्ये लढत झाली. सध्या स्थानिक पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (DMK)यांची काँग्रेस सोबत आघाडी असून भाजप आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (ADMK)यांची भाजपसोबत युती आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.

केरळमध्ये लेफ्ट टेमोक्रेटिक फ्रंड (LDF), काँग्रेस - युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आणि भाजप पक्षात सामना आहे. सध्या केरळमध्ये LDF सत्तेत असून या निवडणूकीत चित्र पालटणार का? याचा अंदाज एक्झिट पोलद्वारे येईल.

आसाममध्ये भाजप सत्तेत आहे. या निवडणूकीत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होणार की आसामची जनता इतर पक्षांना पसंती देणार, याचा अंदाज एक्झिट पोलद्वारे येईलच. तर पुदुच्चेरी मध्ये काँग्रेसचे सरकार होते. मात्र व्ही नारायणसामी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. त्यामुळे पुदुच्चेरी मध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.