कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवून 3 मे पर्यंत केला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होऊ नये म्हणून भारत सरकारने नवीन नियमावली बनवत काही गोष्टींवरील निर्बंध उठविले आहेत. त्याचबरोबर 24 एप्रिलला नियमावली सादर करत भारत सरकार नोंदणीकृत दुकानांना देखील आजपासून दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज देशातील अनेक राज्यांतील दुकाने सुरु झाली आहेत. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई, नवी दिल्ली, वाराणसी येथील दुकाने सुरु झाली आहेत.
मुंबईतील कुर्ला परिसरातील हार्डवेअर, अन्नधान्यांव्यतिरिक्त अन्य नोंदणीकृत दुकाने आजपासून सुरु झाली आहेत. Coronavirus Lockdown Relaxed: देशभरातील नोंदणीकृत दुकाने सुरु करण्यास MHA ची परवानगी; लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या
Mumbai: Customers throng grocery stores in Kurla area to make purchases. MHA has exempted all shops under Shops&Establishment Act of States/UTs,except shops in multi-brand&single-brand malls,outside limits of Municipal Corporations from revised consolidated lockdown restrictions. pic.twitter.com/vufYsWJ42c
— ANI (@ANI) April 25, 2020
त्याचबरोबर दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरातील हार्डवेअरचे दुकान आणि अन्य दुकाने देखील आजपासून उघडण्यात आली आहेत. वाराणसीतील स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने देखील सुरु करण्यात आली आहेत.
Varanasi: Stationery & electronics shops open in Ardali Bazar area. MHA has issued an order to States/UTs to allow opening of certain categories of shops, except those in single & multi-brand malls. These lockdown relaxations are not applicable to hotspots/containment zones. pic.twitter.com/AW0ODpEMHq
— ANI UP (@ANINewsUP) April 25, 2020
आदेशानुसार, केवळ 50% कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने आजपासून दुकाने सुरु करण्यात आली आहेत. मात्र गृहमंत्रालयाचे हे आदेश केवळ नॉन हाटस्पॉट आणि कंटनमेंट झोन नसलेल्या ठिकाणीच लागू करण्यात आले आहेत.