AAP Leaders and Delhi CM Arvind Kejriwal. (Photo Credits: ANI)

सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची आम आदमी पक्षाच्या (AAP) आमदारांसोबतची पहिली भेट पार पडली. या वेळी झालेल्या बैठकीत ओखलाचे आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांची अनुपस्थिती महत्त्वपूर्ण राहिली. खान आणि त्यांचा मुलगा अनस अहमद यांच्यावर नोएडा सेक्टर 95 मधील इंधन पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धमकावल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे कान आणि त्याचा मुलगा अनस हे दोघे फरार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

अमानतुल्ला खान आणि अनस अहमद यांच्यावर गुन्हा दाखल

नोएडा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आप आमदार अमानतुल्ला खान आणि अनस अहमद यांच्यावर या दोघांविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी धमकी देण्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पोलिसांचे पथक त्यांना नोटीस बजावण्यासाठी आमदारांच्या निवासस्थानी गेले होते. परंतू, दोघेही तेथ आढळले नाहीत. खान आणि त्यांचा मुलगा तपासात सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नोएडा पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे फोनही बंद आहेत. (हेही वाचा, Arvind Kejriwal Get Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातून 'या' तारखेपर्यंत जामीन मंजूर)

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास मारहाण

पोलिसांनी सांगितले की, दोघांवरही इंधन पंप कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अनसने इंधन भरण्यासाठी पंपावर जाऊन रांगेत मोडल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. अनसचा एफआयआरमध्ये "अज्ञात" म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्याने आपल्या कारमध्ये आधी इंधन भरावे असा आग्रह धरला आणि विक्रेत्याला मारहाण केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी मनीष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, खान, अनस आणि काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध फेज 1 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Arvind Kejriwal Roadshow: अरविंद केजरीवाल सक्रीय, हनुमान मंदिर भेटीसह करणार रोड शो; पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष, घ्या जाणून)

माझा मुलगा निर्दोष- आमदाराचा दावा

AAP आमदाराने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, त्यांचा मुलगा, कायद्याचा विद्यार्थी असून, ही घटना घडली तेव्हा तो परीक्षेसाठी जात होता. "पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या मुलाशी गैरवर्तन केले आणि त्याला मारहाण केली. आता ते अपूर्ण सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून माझी प्रतिमा खराब करत आहेत आणि मला एकतर्फी पोलिस कारवाईत अडकवत आहेत," असा आरोप त्यांनी केला. खान यांनी असेही म्हटले आहे की, त्यांना स्थानिक पोलिसांकडून कॉल आल्यानंतर ते पेट्रोल पंपावर पोहोचले, त्यांच्या मालकाशी बोलले आणि प्रकरण मिटवले. पण नंतर आपणास कळले की त्याला पोलिसांनी त्यांनाही या प्रकरणात “गोवले” आहे.

आमदार खान यांच्या मुलावर गंभीर आरोप

तक्रारदार विनोद कुमार सिंह यांनी आरोप केला आहे की, अनस त्याच्या कारमध्ये तेथे आला आणि त्याने सेल्समनला आधी त्याच्या कारमध्ये इंधन भरण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सेल्समनला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तो आमदाराचा मुलगा असल्याची धमकी दिली. त्याने कारमधून लोखंडी रॉड काढला आणि आजूबाजूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने कार्ड मशीन देखील फोडली. ज्याचा उल्लेख एफआयआरमध्येही करण्यात आला आहे. सेल्समनचे रक्षण करण्यासाठी, इतर पेट्रोल पंप कर्मचारी हाणामारीत सामील झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले मात्र तो घटनास्थळावरून पळून गेला, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.

आमदारपुत्राची पंप चालक आणि कर्मचाऱ्यांना कथीत धमकी

अनस नंतर इंधन पंपावर परतला आणि तेथील सर्व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. "त्यानंतर त्यांनी दोन गाड्यांच्या ताफ्यात आलेल्या आपल्या वडिलांना फोन केला आणि पंप व्यवस्थापकाला धमकी दिली की, जर तो (खान) मला आणि कामगारांना मारहाण करू लागला तर तो (व्यवस्थापक) काहीही करू शकणार नाही. आमदार नंतर पंपमालकाला फोनवर बोलले  हा पंप आमच्या भागात येतो आणि तुम्ही इथे व्यवसाय करण्यासाठी असाल तर करुन दाखवा, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

आप आमदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यात स्वेच्छेने दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि खोडसाळपणा करणे यासारख्या कलमांचा समावेश आहे. ओखलाचे दोन वेळा आमदार राहिलेले खान यांना गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी 'वाईट चारित्र्य' म्हणून घोषित केले होते.

दिल्ली आणि पंजाब सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न- केजरीवाल

दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप आमदारांना सांगितले की 21 मार्च रोजी अटक केल्यानंतर भाजपला दिल्ली आणि पंजाबमधील पक्षाची सरकारे पाडायची होती. परंतू त्यांना त्यात यश आले नाही. पण अटकेनंतर 'आप' आणखी एकवटल्याचे त्यांनी सांगितले. "मला अटक करतील, पक्ष फोडतील, दिल्लीत आणि नंतर पंजाबमध्येही सरकार पाडतील, अशी त्यांची योजना होती. अटकेनंतर त्यांचा प्लॅन फसला. तुम्ही सगळे फुटले नाहीत," असे त्यांनी आमदारांना सांगितले.

दरम्यान, विद्यमान स्थितीतर रद्द करण्यात आलेल्या दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपच्या राष्ट्रीय संयोजकाला अटक केली. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला जेणेकरून ते सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करू शकतील. सात टप्प्यातील निवडणुकीच्या शेवटच्या फेरीच्या मतदानानंतर 2 जून रोजी त्यांना शरणागती पत्करावी लागणार आहे.