जगभरातील अनेक देशांतील तरुणाई आणि नागरिक 14 फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा करत असते. भारतातील अॅनिमल वेल्फेअर बोर्डाला (Animal Welfare Board) मात्र, 14 फेब्रुवारी हा दिवस ‘काउ हग डे’ (Cow Hug Day) म्हणजेच गाईला आलिंगन दिवस म्हणून साजरा करावासा वाटतो. विशेष म्हणजे या बोर्डाने तसे पत्रकही काढले आहे. ज्याची सोशल मीडियावर भलतीच चर्चा सुरु आहे. या पत्रकात ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी 14 फेब्रुवारीहा दिवस गाईला आलिंगन दिवस म्हणून साजरा कारावा असे म्हटले आहे. म्हणून साजरा केला जातो.
भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पत्रकातील निर्देशानुसार, गाय ही एक समृद्ध आणि उपयुक्त पशू आहे. त्यामुळे ती 'भावनिक समृद्ध'ही आणते. त्यामुळे 14 फेब्रुवारी या दिवशी गाईला आलींगन देऊन हा दिवस साजरा करावा. शिवाय, मंत्रालयाने विभागीय सचिवांना उद्देशून म्हटले आहे की, पाश्चात्य प्रभावामुळे भारतीय संस्कृतीच्या ऱ्हासाची दखल घेऊन गाईंना मिठी मारण्याचे अवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा, Happy Rose Day 2023 Wishes and Valentine’s Week Greetings: रोज डे चे कोट्स, HD वॉलपेपर, सुंदर संदेश, खास व्यक्तीला शेअर करून द्या खास शुभेच्छा, पाहा)
ट्विट
14 Feb जग भरात व्हॅलेंटाईन्स डे म्हणून साजरा केला जातो.आणि भरतात 14 Feb आता गाईला मिठी मारा असा साजरा केरण्याचे आदेश निघाले pic.twitter.com/UYTwSc8Zco
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 8, 2023
पत्रकात काय म्हटले आहे?
आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ती आपले जीवन टिकवते आणि पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्व संपत्ती देणाऱ्या मातेसारख्या पोषक स्वभावामुळे तिला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखले जाते, असे अॅनीमल वेल्फेअर बोर्डाच्या पत्रकात म्हटले आहे.
अॅनीमल वेल्फेअर बोर्डाचे पत्रकात पुढे दावा करण्यात आला आहे की, गायीला मिठी मारल्याने भावनिक समृद्धता येईल आणि त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढेल. त्यामुळे सर्व गोप्रेमींनी माता गायींचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण करण्यासाठी 14 फेब्रुवारी हा दिवस गाई आलिंगन दिवस म्हणून साजरा केला पाहिजे,” असेही या पत्रकात म्हटले आहे.