भारतात वर संकटाची रीघ सुरुच आहे. कोरोना व्हायरस आणि चक्रीवादळ धोका हा भारताच्या पाठी असताना आता भूकंपाचे धक्के बसण्याच्या घटना देखील सुरु झाल्या आहेत. हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये आज दुपारी 1 च्या सुमारास तीव्र भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 2.1 रिश्टेर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंप केंद्राने ही माहिती दिली आहे. सकाही दिवसांपूर्वी भारताची राजधानी दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या नोएडा (NCR) मध्ये भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल (Richter Scale) नोंदवली गेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतात भूकंपाचे धक्के बसल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. यात गेल्या दीड महिन्यांत भूकंपामुळे दिल्ली आणि आसपासचा परिसर 11 वेळा हादरला आहे. Earthquake in Delhi NCR Again: राजधानी दिल्लीजवळील नोएडा येथे भूकंपाचे धक्के; 3.2 रिश्टर स्केल तीव्रता, फरीदाबादपर्यंत जाणवले हादरे
An earthquake with a magnitude of 2.1 on the Richter Scale hit Gurugram, Haryana today at 1300 hours: National Center for Seismology
— ANI (@ANI) June 8, 2020
याआधी मे महिन्यात राजधानी दिल्ली-एनसीआर, हरियाणा (Haryana), पंजाब राज्यांसह देशातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 4.6 इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हरियाणा राज्यातील रोहतक येथे होता. या आधी 15 मे रोजी दिल्ली येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या वेळी भूकंपाचा केंद्र बिंदू पीतमपुरा परिसरात होता. त्या भूकंपाची तीव्रता 2.2 इतकी होती. दरम्यान 15 मे पूर्वीही 10 मे रोजी दिल्ली येथे 3.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.