गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अमूल कंपनीची खास श्रद्धांजली (Photo)
Manohar Parrikar (Photo Credit: Twitter)

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे रविवारी निधन झाले. त्यानंतर पर्रीकरांना राजकीय नेते आणि विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. आता अमूलनं (Amul) खास फोटो पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. मनोहर पर्रीकरांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो वापरुन 'हर गाव का मनोहर' असं शीर्षक देत अमूलने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अमूलने लिहिले की, राजकारणी आणि नेत्याला सलाम.

अमूलंच ट्विट:

गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या पर्रीकरांनी रविवार (17 मार्च) रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात एकच शोककळा पसरली. पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांनी, अभिनेत्यांनी या साध्या सरळ नेत्याला श्रद्धांजली वाहिली.