पंजाब बॉम्ब स्फोट हल्लेखोराची माहिती द्या, लाख रुपये घेऊन जा!
अमृतसर बॉंम्ब स्फोट ( फोटो सौजन्य - ANI )

अमृतसर येथे रविवारी सकाळच्या सुमारास निरंकारी पंथाच्या 'संत समागम' या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी  बॉम्ब स्फोट करण्यात आला. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर राज्यभरात हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आहे.

अमृतसर येथे धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन दोन अज्ञात व्यक्तींनी बुरखा घालून सभागृहाच्या पाहरेकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत सभागृमध्ये घुसले. त्यानंतर या दोन व्यक्तींनी त्यांच्याजवळ असलेला हात बॉम्ब काढून लोकांच्या दिशेने फेकून तेथून पळ काढला आहे. त्यामुळे तातडीने एकआयएची तुकडी घटनास्थळी पोहचून या हल्ल्याचा तपास करत आहेत. तर हा दहशतवादी हल्ला असावा असे अमृतसर पोलीस आयुक्त एस. श्रीवत्स यांनी सांगितले आहे.

तसेच या प्रकरणी. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी हल्लेखोराबद्दल माहिती देणाऱ्यास चक्क 50 लाख रुपये बक्षिस देण्याचे जाहिर केले आहे. तर या हल्ल्यामध्ये पाकिस्तानसमर्थित खलिस्तानी किंवा काश्मिरी अतिरेक्यांचा हात असावा असा संशय बाळगला जात आहे. मात्र मृत वक्तींचा परिवाराला पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.