अमित शाह व राहुल गांधी (File Image)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग देशातील अनेक राजकारणी नेत्यांना झाला आहे. समाजकारणात भाग घेणाऱ्या या नेत्यांचा दिवसाकाठी अनेक लोकांशी संपर्क येत असतो, अशात काही नेतेमंडळींना या विषाणूचा फटका बसला आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit  Shah) यांना कोरोनाची लागण झाली असुन, त्यांना त्वरित दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटल (Medanta Hospital) मध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांच्या स्वास्थ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या आहेत. अशात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही ट्विट करुन अमित शाह हे लवकर बरे व्हावे अशी कामना केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये फक्त एकच ओळ लिहिली आहे. ते म्हणतात, ‘श्री. अमित शाह हे लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.’ रविवारी (2 ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. शहा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच पक्षातील नेत्यांसह अनेक विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार यांनी ते लवकर बरे व्हावेत याची कामना केली आहे. (हेही वाचा: केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह यांंना कोरोनाची लागण; मेदांता हॉस्पिटल मध्ये दाखल)

राहुल गांधी ट्वीट-

राहुल गांधी यांच्यासोबतच, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, त्यांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना केली आहे. यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे सीएम शिवराजसिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी अशा अनेकांनी ट्वीट करत अमित शाह लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीयो यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली असल्याने, त्यांनी काही दिवस सेल्फ आयलोशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.