Amit Shah | (Photo Credits: BJP4India)

स्वाईन फ्लू मुळे आजारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह (BJP Chief Amit Shah) यांना All India Institute of Medical Sciences (AIIMS) या रुग्णालयातून डिचार्ज देण्यात आला आहे. स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना बुधवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. स्वाईन फ्लू: भाजप अध्यक्ष अमित शाह रुग्णालयात दाखल; पक्षकार्यात मोठा अडथळा

स्वाईन फ्लू झाल्याची माहिती खुद्द अमित शाह यांनी ट्विट करुन दिली होती. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, "मला स्वाईन फ्लू झाला असून त्यावर उपचार चालू आहे. परमेश्वराची कृपा, तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे लवकरच बरा होईन." त्यानंतर त्यांना बुधवारी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी अमित शाह यांना भेटायला भाजपच्या अनेक नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. आश्विनी चौबे, अनिल बलूनी यांच्यासमवेत अनेक नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अमित शाह रुग्णालयातून बाहेर पडताच 22 जानेवारीला पश्चिम बंगाल येथील मालदा येथे ते पहिल्या रॅलीत सहभागी होतील. त्यानंतर 23-24 जानेवारी रोजी आयोजित रॅलीतही सहभाग घेतील.