BSE Sensex Update: कोरोना व्हायरस चं मुंबई शेअर बाजारावर सावट कायम; सेन्सेक्स, निफ्टी कोसळले
शेयर बाजार (File Image)

Sensex Today : मुंबई शेअर बाजारावर आजही कोरोना व्हायरसचं सावट कायम आहे. दरम्यान कोरोनाच्या भीतीमुळे अर्थव्यवस्था जगभरात कोलमडली आहे. दरम्यान आज मंगळवार (17 मार्च) दिवशी सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या घसरणी सह 31,611.57 अंकांवर उघडला आहे. तर निफ्टी देखील 9018.10 वर उघडली आहे. बीएसईच्या सेनेक्समध्ये आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी सुरूवातीच्या व्यवहारांमध्ये 315.64 अंकांची घसरण पहायला मिळाल्याने आता तो 31075.85 सह उघडला तर निफ्टी 111.30 अंकांच्या घसरणीसह 9086.10 पर्यंत पोहचला होता. दरम्यान काल (16 मार्च) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 1500 हून अधिक अंकांनी सेन्सेक्स कोसळला होता. तर निफ्टी देखील 9587.80 वर उघडली होती. दरम्यान कोरोना चा फटका एशियन बाजारांंप्रमाणेच अमेरिकेसारख्या बलवान देशालाही बसला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त करताना 'मंदी'ची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपया 23 पैशांनी वधारला आहे. तो सध्या 74.02 रूपये इतका आहे. दर सोन्याच्या दरातही मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात आठवडाभरात 5 हजारांची घट झाली आहे.

ANI Tweet

दरम्यान आज टॉप पर्सेंट लूझरमध्ये UPL, Zee Entertainment, HDFC, HDFC Bank ,ICICI Bank यांचा समावेश होता. यांचं ट्रेडिंग सुमारे 2.66% ते 6.25% यांच्यामध्ये झाले. तर Yes Bank, Tata Steel, Vedanta, Maruti Suzuki,Adani Ports यांचे शेअर्स सुमारे 1.74% ते 9.97% वधारले असल्याने ते टॉप गेनर्स मध्ये होते.

महाराष्ट्रात सध्या 39 कोरोनाग्रस्त असून देशात 125 जणांना कोरोनाची बाधा आहे. देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत.