मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये ई कॉमर्स साईट अमेझॉनचे भारतातील (Amazon India) एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांच्या विरूद्ध NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन गांजा ची विक्री केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश पोलिसांनी मागील आठवड्यात काहींना ऑनलाईन गांजा खरेदी अंतर्गत अटक केली तेव्हा हा प्रकार समोर आला. त्यांच्या कडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी 1000 किलो बेकायदेशीर वस्तूंचा पुरवठा केला. आरोपी हे त्यांची कंपनी अमेझॉन द्वारा प्लान्ट बेस्ट स्वीटनर स्टिव्हिया यांची विक्री करून चालवत होता.
सुपरीडंट ऑफ पोलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अमेझॉन एक्झिक्युटिव्ह या बेकायदेशीर वस्तूंची ने-आण करण्यास लॉजिस्टिकली मदत करत होते. ही कारवाई तेव्हा करण्यात आली जेव्हा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कंपनीच्या अधिकार्यांना कारवाई मध्ये सहकार्य किंवा परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा असे दोन पर्याय दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करताना एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कारवाई केली.
अमेझॉन कडून जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंट मध्ये दिलेल्या माहितीमध्ये Amazon भारतामध्ये एक मार्केटप्लेस चालवते जे विक्रेत्यांना थेट ग्राहकांना डिस्प्ले करण्यास, यादी करण्यास आणि विक्रीसाठी ऑफर करण्याची मुभा देते. जर यामध्ये काही प्रतिबंधित वस्तूंचा समावेश असेल त्यावर कंपनीकडून कारवाई केली जाते. सध्या आमच्या समोर ही गोष्ट आली असून त्याचा अधिक तपास सुरु आहे.