वृत्तवाहिन्यांवर नेहमीच अनेक विषयांवर चर्चा होत असतात. यामध्ये दोन विरोधी पक्ष एकमेकांसोबत भांडताना आपण नेहमीच पाहिले आहे. कधी काही यामध्ये एखाद्या विधानामुळे इतका वाद वाढतो की त्याचे रुपांतर मोठ्या भांडणामध्ये होते. परंतु आता आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) तेलुगु वृत्तवाहिनीवरील चर्चेत असे काहीतरी घडले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका टीव्ही चर्चेत भाजपच्या नेत्यावर (BJP Leader) बूट फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप नेते विष्णुवर्धन रेड्डी (Vishnu Vardhan Reddy) यांच्यावर श्रीनिवास राव (Kolikapudi Srinivasa Rao) यांनी चप्पल भिरकावली आहे.
जगन सरकारने आंध्र प्रदेशच्या राजधानीतील तीन राजधानींच्या प्रस्तावानंतर अमरावतीत काम जवळजवळ थांबवले आहे, शेतकरी व महिला राजधानीसाठी 434 दिवस आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिनीने मंगळवारी थेट चर्चेचे आयोजन केले होते. या वादविवाद कार्यक्रमात, अमरावती प्रदेश समितीच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव, भाजपा प्रदेश सरचिटणीस विष्णुवर्धन रेड्डी आणि राजधानी अमरावतीबाबत इतर काही लोक चर्चेत सहभागी झाले होते.
TV debate turns ugly !! #BJP #AndhraPradesh State General Secretary Vishnuvardhan Reddy was hit by a slipper by another participant in a live debate. Party condemned the incident. pic.twitter.com/78gYHr6PC6
— Aashish (@Ashi_IndiaToday) February 23, 2021
दरम्यान, हा वाद विष्णुवर्धन आणि जेएसी नेते श्रीनिवास राव यांच्यात उद्भवला. विष्णुवर्धन रेड्डी यांनी श्रीनिवास राव यांच्यावर टीडीपीशी संबंध असल्याचा आरोप केल्याने वादाला तोंड फुटले. इतकेच नाही तर त्यांनी राव यांची थट्टाही केली. त्यानंतर मात्र राव यांना आपला राग अनावर झाला व त्यांनी या भाजप नेत्यावर चप्पल भिरकावली. या घटनेमुळे चर्चेचे थेट प्रसारण करणार्या अँकरला ब्रेक घ्यायला लावण्यास भाग पाडले. (हेही वाचा: भारतीय लष्करातील जवानांनाही आवरला नाही ‘पावरी’ ट्रेंडचा मोह; पहा Viral Video)
या घटनेनंतर चर्चेत भाग घेणारे इतर पॅनेलचे सदस्यही आश्चर्यचकित झाले. भाजपचे राज्य युनिटचे प्रमुख सोमू वीरराजू यांनी एका ट्विटमध्ये या घटनेचा निषेध केला आहे. राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनीही घटनेचा निषेध करत वीरराजू यांना पाठींबा दिला आहे.