Viral Video (Photo Credits: Twitter)

सध्या सोशल मीडियावर 'पावरी हो रही है' (Pawri Ho Rahi Hai) ट्रेंड भलतंच व्हायरल होतं. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींना देखील या ट्रेंडची भूरळ पडली आहे. त्यातत आता भारतीय लष्करातील जवानांनाही 'पावरी' चा मोह आवरता आलेला नाही. जवानांचा 'पावरी हो रही है' चा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, सीमेवरील भारतीय जवान हे एका बर्फाळ प्रदेशात हातात बंदुका घेऊन उभे आहेत. त्यात एक जवान म्हणतो, "ये हम हैं, ये हमारी गन हैं और हम याहा पेट्रोलिंग कर रहे हैं." तसंच या व्हिडिओमध्ये जवान तैनात असलेल्या आजूबाजूच्या परिसराची देखील झलक पाहायला मिळत आहे.

आयएएस अधिकारी अविनाश सारन यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून तो भलताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण, शाहीद कपूर यांच्यासह मराठी सेलिब्रिटींनी देखील पावरी ट्रेंड फॉलो करत फोटोज, व्हिडिओज शेअर केले होते.

पहा व्हिडिओ:

पाकिस्तानमधील एका 19 वर्षीय मुलीने पार्टी करत असल्याचा सेल्फी व्हिडिओ काढला होता. त्यानंतर तिच्या अमेरिकन अॅक्सेंटवरुन ट्रोल करत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यात ती 'ये हमारी कार है, ये हम है और ये हमारी पार्टी हो रही है,' असे म्हणत असते. परंतु, 'पार्टी' या शब्दाच्या उच्चारावरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आणि त्यावरुन 'पावरी' ट्रेंड सुरु झाला. सध्या हा ट्रेंड भारत आणि पाकिस्तानमध्ये लोकप्रिय झाला असून 2021 मधील सर्वांत मोठा ट्रेंड ठरत आहे.