राजधानी दिल्लीतील इंडिया गेट (India Gate) अमर जवान ज्योती (Amar Jawan Jyoti) आता कायमची हटवली जाणार आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारने हा निर्णय घेतला आहे. अमर जवान ज्योती ही आता नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) इथे विलीन केली जाणार आहे. आज (21 जानेवारी) दुपारी 3.30 वाजता ही मशाल नॅशनल वॉर मेमोरियल येथे विलीन केली जाईल. नॅशनल वॉर मेमोरियल येथेही एक मशाल कायम तेवत राहील. दरम्यान, इंडिया गेट आणि नॅशनल वॉर मेमोरियल अशा दोन्ही ठिकाणी मशाली कायम तेवत ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने कठीण आहे. त्यामुळे ही ज्योत विलीन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्रसारमाध्यमांनी लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जर शहीदांसाठी नॅशनल वॉर मेमोरियल बनविण्यात आले आहे तर मग इंडीया गेट येथे अमर जवान ज्योती का तेवत ठेवली जाते. नॅशनल वॉर मेमोरियल येथे सर्व शहीदांची नावे आहेत. शहीदांचे कुटुंबीय येथे येतात. 25 फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरीयलचे उद्घाटन केले होते. त्यासाठी 40 एकर जमीनीवर 176 कोटी रुपये खर्च करुन ही भव्य मेमोरीयलचे उभारले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi On BJP: मोदी सरकारचं अजून एक आश्वासन ठरलं खोटं, राहुल गांधींची टीका)
ट्विट
Amar Jawan Jyoti should be merged with National War Memorial. There should be only one war memorial in the country, the 1971 war veteran and former Army Deputy Chief Lt Gen JBS Yadava (Retd) added.
— ANI (@ANI) January 21, 2022
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. तसेच, आमचे सरकार आल्यावर आम्ही ही ज्योत पुन्हा याच ठिकाणी तेवत ठेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.
बहुत दुख की बात है कि हमारे वीर जवानों के लिए जो अमर ज्योति जलती थी, उसे आज बुझा दिया जाएगा।
कुछ लोग देशप्रेम व बलिदान नहीं समझ सकते- कोई बात नहीं…
हम अपने सैनिकों के लिए अमर जवान ज्योति एक बार फिर जलाएँगे!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2022
दरम्यान, इंडिया गेट ब्रिटीश सरकारने पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतींमध्ये उभारले होते. त्यानंतर 1972 आणि 1971 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रित्यार्थ अमर जवानज्योती तेवण्यात आली. या युद्धात भारताचा विजय झाला होता. तसेच, बांग्लादेशची निर्मिती झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जानेवारी 1972 मध्ये याचे उद्घाटन केले होते.