Digital Gold Shopping | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Akshaya Tritiya Digital Gold Shopping 2020: अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) मुहूर्त साधण्यासाठी देशभरातील नागरिक सोने खरेदी करत असतात. मात्र, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने ही खरेदी ठप्प आहे. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोने व्यापारी आणि ज्वेलर्स ग्राहकांना ऑनलाईन सूवर्ण खरेदी (Gold Buy Online Offer In india) करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. आपण आपली सूवर्ण खेरेदी आजच्या दराने करायची आणि लॉकडाऊन संपल्यानंतर ग्राहकांनी या सोन्याची डिलिवरी घ्यायची, अशी ही ऑफर आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीया डिजिटल गोल्ड शॉपिंग (Digital Gold Shopping) स्वरुपात साजरी होताना दिसते आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लॉकडाऊन (Lockdown) असल्याने सर्व ठिकाणीची ज्वेलर्स, सोने खरेदी-विक्री दुकाने बंद आहेत. सोने व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागत आहेत.

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोशिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी आयएनएसशी बोलताना सांगितले की, अक्षय्य तृतीया हा सूवर्ण खरेदीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ऑनलाईन सोने खेरेदीची ऑफर दिली आहे. सध्यास्थितीत हिच चांगली संधी असू शकते, असेही मेहता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार देशभरातील अनेक दुकाने उघडण्यात आली आहेत. पण, त्याला अटी आणि मर्यादा आहेत. गुजरात, ओडिसा येथील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उखडल्याचे आयएनएसने म्हटले आहे. केंद्र सरकारने 15 एप्रिलपासून लॉकडाऊन काहीसा शिथील केला आहे. ग्रीन झोन म्हणजेच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव फारसा जाणवला नाही अशा ठिकाणी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अशा ठिकाणीही कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्केपेक्षा अधिक असणार नाही, अशी अट आहे. (हेही वाचा, Akshaya Tritiya 2020 निमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करताय? हे आहेत '5' ऑनलाईन पर्याय)

गेल्या वर्षीचा विचार करता अक्षय्य तृतिया या सणाला देशभरात तब्बल 23 टन सोने खरेदी करण्यात आले होते. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोशिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी अंदाज व्यक्त केला की, डिजिटल खरेदी चांगली राहिली आणि काही प्रदेशात दुकाने उघडली गेली तरीही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 10-15 टक्के इतकीच सोने खरेदी होऊ शकेल.

केडिया अॅडवायजरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी म्हटले आहे की, कोरनाने आमचा काम करण्याची पद्धतच बदलली आहे. जसे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठका होत आहेत. निर्णय घेतले जात आहेत तसेच, आमच्या क्षेत्रातही डिजिटल खरेदी होऊ लागली आहे. खास करुन अक्षय्य तृतीया खरेदीही यंदा अशीच होईल. कोरोनाचे संकट पाहता जागतिक मंदीत सोने दर उसळी मारण्याची शक्यता अधिक प्रमाणात व्यक्त केली जात आहे.