Image of Air India flight used for representational purpose | (Photo Credits: ANI)

8 मार्च म्हणजे आज जागतिक महिला दिन (International Women's Day). आजच्या या खास दिनानिमित्त एअर इंडियाने (Air India) स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी विशेष योजना आखली आहे. आज दिवसभरातील सर्व विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट्सवर सोपवण्यात आले आहे. आज दिवसभरात सुमारे 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हुन अधिक देशांतर्गत विमानांचे उड्डाण होणार आहे. या सर्व विमानांत केवळ महिला पायलट असतील. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रु मेंबर्स असणार आहेत. Air India च्या विमानात आता घुमणार 'जयहिंद'चा जयघोष

एअर इंडियाच्या या खास निर्णयामुळे दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाई, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को या विमानांची संपूर्ण जबाबदारी उच्च प्रशिक्षित महिला पायलटर्सवर सोपवण्यात येणार आहे.

एअर इंडियाचा हा निर्णय अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे. कारण यामुळे एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करते, असे एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी सांगितले.