इंदौर मधील केदारनाथ चा निवासी 27 वर्षीय अघोरी बाबा ने 'अर्धनारीश्वर' बनण्याचं स्वप्न आल्यानंतर आपलं लिंग बदलून घेण्याचा निर्णय घेतला. बाबा ने इंदौर मधील भंडारी हॉस्पिटल मध्ये आपलं लिंग बदलून स्त्री केलं आहे. पुरूषातून महिला होण्याचं त्याचं हे ऑपरेशन सुमारे 5 तासांची शस्त्रक्रिया होती. ही शस्त्रक्रिया भंडारी हॉस्पिटल मध्ये प्लॅस्टिक कॉस्मेटिक आणि रि कस्ट्रटीव्ह सर्जन डॉ. अश्वीन दास यांनी केली आहे. चैन्नई मध्ये त्याच्यावर प्राथमिक सर्जरी झाली त्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाची लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.
मीडीया रिपोर्टनुसार, हा बाबा दक्षिण भारतातील एका ब्राम्हण कुटुंबातील आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आपलं घर, संसार सोडलं आहे. उत्तराखंड च्या केदारनाथ मध्ये साधूचं जीवन जगत आहे. बुधवारी उत्तराखंड मधून इंदौरला येऊन गुरूवारी शस्त्रक्रियेसाठी ते हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत.
चैन्नई मध्ये झालेल्या प्राथमिक शस्त्रक्रियेत त्यांच्या शरीरातून पुरूष अवयव काढण्यात आले. त्या शस्त्रक्रियेनंतर आवश्यक कागदापत्रांवर त्याने लिंग बदललं आहे. आधार आणि पॅन कार्ड वर देखील लिंग बदललं आहे.
अघोरी बाबा ची कार देखील त्यांचा परिचय देते. बाबांच्या गाडीच्या पुढच्या डॅशबोर्डवर अनेक कवट्या ठेवलेल्या आहेत. गाडीवर सर्वत्र स्टिकर्स आहेत ज्यावर ते स्वतः भगवान शंकरासोबत बसलेले दिसत आहेत. बाबांच्या गाडीच्या काचांवर 'डेंजर' लिहिले आहे.
त्याचबरोबर कारवर त्यांचा स्वतःचा एक फोटोही लावण्यात आला असून त्यात ते ध्यान करताना दिसत आहेत. बाबांच्या गाडीच्या नंबर प्लेटच्या जागी अघोरी नागा साधू असे लिहिले आहे.