 
                                                                 अदानी समूह (Adani Group) आता आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत. अदानी पॉवरनं (Adani Power) लॅन्को अमरकंटक पॉवरला (Lanco Amarkantak Power) 4100 कोटी रुपयांची सुधारित ऑफर सादर केली आहे. औष्णिक वीज कंपनी लॅन्को अमरकंटक सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे अदानी समूहासोबत कंपनीची बोलणी सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरुन आहे. औष्णिक वीज कंपनी लॅन्को अमरकंटक विकत घेण्यासाठी अदानी समूहानं यापूर्वी 3650 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. (हेही वाचा - Stock Market News: सेन्सेक्सने ओलांडला 70 हजारांचा टप्पा, निफ्टीचीही विक्रमाकडे वाटचाल)
लॅन्को अमरकंटकवर मोठं कर्ज आहे, याच कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी आपला स्टेक विकत आहे, अशी माहिती मिळत आहे. दानी समुहानं सहा महिन्यांत आपली दुसरी ऑफर सादर केली आहे. यावरून लॅन्को अमरकंटकच्या खरेदीत अदानी पॉवर किती स्वारस्य दाखवत आहे.
अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात अदानी पॉवरचे शेअर्स 21.21 टक्क्यांनी वाढले होता. याशिवाय, गेल्या तीन महिन्यांत स्टॉकनं 44.60 टक्के परतावा दिला आहे. फेब्रुवारीमध्ये हाच प्रति शेअर 132.40 रुपये होता, परंतु तेव्हापासून आतापर्यंत शेअर इतका वेगानं वाढला आहे की, त्यानं गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
