File image of Rahul Gandhi and Aaditya Thackeray | (Photo Credits: PTI/Instagram)

राजकरणातील नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या विधानांमुळे नेहमीच चर्चा किंवा वाद झाल्याचे समोर आले आहे. परंतु काही राजकीय नेते अज्ञातपणे काही वेळेस वादग्रस्त विधान करतात तर काही जण सुज्ञातपणे आपण चर्चेत रहावे म्हणून काही विधाने करुन मोकळे होतात. असे फक्त राजकरणात होत असल्याचे बहुतांश वेळा दिसून येते. मात्र सोशल मीडियात एका पत्रकाराचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यामध्ये 'आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे शिवसेनेचे राहुल गांधी सिद्ध होतील' असे लाईव्ह शो दरम्यान बोलताना दिसून आले आहे. तर लाइव्ह दरम्यान पत्रकाराचा आवाज म्यूट करण्यात आला नसल्याने आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल विधान समोर आले आहे.

आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान आज तक या हिंदी वृत्तवाहिनीतील वरिष्ठ महिला पत्रकार अंजना ओम प्रकाश यांनी केले आहे. या व्हिडिओतून असे स्पष्ट होत आहे की, लाइव्ह शो दरम्यान पीसीआर मध्ये झालेल्या काही चुकीमुळे अंजना यांचे हे विधान लाइव्ह झाले. मात्र त्यांना हे विधान चॅनलवर बोलायचे नव्हते. अंजना ओम प्रकाश यांनी आदित्य ठाकरे शिवसेनेचे राहुल गांधी होतील हे सिद्ध होईल असे विधान केले असल्याचे स्पष्टपणे ऐकायला येत आहे. हे विधान सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे.

परंतु यावर शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत अंजना ओम प्रकाश यांच्यावर टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोण कसे आहे ते वेळ सिद्ध करेलच, पण काही पत्रकार आधीच भाड्याचे टट्टू सिद्ध झाले आहेत. पत्रकारितावर लक्ष द्यावे, रस्त्यावरील पोपट सुद्धा पैसे देऊन भविष्यवाणी करत असल्याचा संताप व्यक्त केला आहे.

मात्र आदित्य ठाकरे यांच्याबाबात अनावधानतेने केलेल्या वक्तव्यावर अंजना ओम प्रकाश यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावर खंत व्यक्त करते असे म्हटले आहे.(Assembly Election 2019: महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुलवामासारखी घटना घडवली जाऊ शकते; शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप)

इंडिया टुडे कॉन्क्लेव मध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाले होते त्यावेळी हे विधान अंजना ओम प्रकाश यांच्याकडून करण्यात आले होते. तर पीसीआर मधील काही गोंधळामुळे अंजना यांचा माईक सुरुच राहिला आणि त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्याबाबत असे विधान केले गेले आहे.