Doctors Death Cases in India:देशात कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus 2nd Wave)ही पहिल्या लाटेपेक्षा तिप्पट वेगाने आली. यात कोविड रुग्णांच्या संख्येत लाक्षणिक वाढ झाली पण त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ झाली. तसेच या लाटेत न केवळ कोविड रुग्ण तर त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टर्संनाही कोविडची लागण होऊन अनेकांचा जीव गेला. IMA ने दिलेल्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या दुस-या लाटेत देशातील एकूण 646 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. देशात सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू हा दिल्लीत झाला आहे. दिल्लीत 109 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

दिल्लीपाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये सर्वाधिक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बिहारमध्ये 97, उत्तर प्रदेशात 79, राजस्थानमध्ये 43, झारखंडमध्ये 39, गुजरातमध्ये 37, आंध्र प्रदेशमध्ये 35, तेलंगाणा 34, तामिळनाडूत 32, पश्चिम बंगालमध्ये 30,महाराष्ट्रमध्ये 23, ओडिशामध्ये 23, मध्य प्रदेशात 16 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती IMA ने दिली आहे.हेदेखील वाचा- Covid-19 Vaccination in India: भारतात 17 कोटींहून अधिक लोकांनी घेतला कोविड-19 लसीचा पहिला डोस; लसीकरणात अमेरिकेला टाकले मागे

भारतात आज 1,20,529 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 3,380 मृतांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासांत 1,97,894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 86 लाख 94 हजार 879 इतकी झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 3 लाख 44 हजार 082 वर पोहोचला आहे. देशात काल दिवसभरात 1 लाख 97 हजार 894 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन घरी परतले आहेत. सद्य घडीला देशात 15 लाख 55 हजार 248 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान देशात आतापर्यंत तब्बल 17.2 कोटी नागरिकांनी लसीचा पहिला डोस (Vaccine First Dose) घेतला असून लसीकरणात भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत 3 जूनपर्यंत 16.9 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, असे केंद्र सरकारने सांगितले. कोविड-19 लसींचा पुरवठा आणि लसीकरणाचा वेग यावर सरकार करत असलेल्या प्रयत्न अधोरेखित करताना ही माहिती देण्यात आली.