मुंबईमध्ये आज 599 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 20 जणांचा मृत्यू ; 9 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Nov 09, 2020 11:44 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम असून दिल्लीकरांची अधिकच चिंता वाढली आहे. कारण तेथे रुग्णांच्या संख्येत तुफान वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही अधिक बिघडत चालली आहे. त्यामुळे दिल्लीतील विविध परिसरात धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले आहे. पण अशा पद्धतीचे वातावरण कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. दिल्लीतील आनंद विहार येथे AQI ची 484 नोंद, मुंडका मध्ये 470, ओखला 464 फेज 2 आणि वाझीपूर येथे 468 नोंद करण्यात आल्याची माहिती CPCB कडून देण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे. तसेच अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. पण दिवाळीच्या काळात प्रदुषण टाळण्याचे सुद्धा आवाहन त्यांनी केले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वारणसी, उत्तर प्रदेश येथे विविध प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.