मध्यप्रदेश: मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांचे राजीनामे घेतले; 9 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Mar 09, 2020 11:54 PM IST
मुंबईतील भायखाळा येथे आग लागल्याची घटना समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
आज (9 मार्च) देशात सर्वत्र होळीचा उत्साह पाहायला मिळेल. देशातील विविध भागात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी होळीचा असली तरी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. होळी पाठोपाठ येणाऱ्या धुलिवंदन आणि रंगपंचमी या सणांवर मात्र यंदा कोरोना व्हायरसचे सावट राहील. त्यामुळे रंग, पिचकाऱ्या यांच्या खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
त्याचबरोबर यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन मेळाव्याचे पहिल्यांदाच मुंबई बाहेर आयोजन करण्यात आले आहे. मनसेचा चौदावा वर्धापनदिन यंदा नवी मुंबईतील वाशी येथे पार पडणार आहे. या प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
(Maharashtra Weather Update: उन्हाळा लांबणीवर; विदर्भात 10 ते 12 मार्च मध्ये पावसाचा इशारा)
होळीनंतर साधारणपणे उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र यंदा उन्हाळा लांबणीवर पडला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या ढगाळ असून अनेक भागात रात्री गारवा जाणवतो. त्याचबरोबर विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.