पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि Uzbek अध्यक्ष Shavkat Mirziyoyev संपूर्ण द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील ; 9 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Dec 10, 2020 12:10 AM IST
एकीकडे संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) मोठे युद्ध लढत असताना देशाच्या सीमेवर भारतीय सैनिक देशाच्या रक्षणासाठी आणि देशात शांतता टिकून राहण्यासाठी त्याहून मोठे युद्ध लढत आहे. त्यात आज जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील पुलवामा च्या टिकेन भागात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली नसून याबाबत तपास सुरु आहे. तसेच याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान नवी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून राष्ट्र्वादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहे. शेतक-यांना योग्य ती न्याय मिळावा यासाठी ही महत्वपूर्ण भेट असणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मराठा आरक्षण स्थगिती (Maratha Reservation Postponement) मागे घ्यावी ही महाराष्ट्र सरकारच्या मागणीबाबत आज फैसला होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत ((Maratha Reservation) स्थापन करण्यात आलेले घटनापीठ राज्य सरकारच्या मागणीवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी (Maratha Reservation Hearing) घेणार आहे.