Live
ठाणे: अंबरनाथमधील मोरीवली औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याला आग ; 8 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Feb 08, 2020 11:07 PM IST
दिल्ली मध्ये आज विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सत्ता पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न प्रचार सभेवेळी करण्यात आला. त्यामुळे आता दिल्लीत कोणाचे सरकार येणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 200 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलकांनी अनधिकृतपणे रस्ता रोको केल्याचे तक्रारीमध्ये महापालिका सहाय्यक आयुक्त अल्का ससाणे यांनी म्हटले आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
मुंबईत किमान तापमानाचा पारा 14अंशांपर्यंत घसरला आहे. तसेच कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निफाड येथे तापमानाचा पार 18 अंशावर पोहचला आहे.