8 वर्षांच्या मुलीने राहुल गांधींना समजावली राफेलची किंमत; निर्मला सीतारमण यांनी शेअर केला व्हिडिओ (Video)
Rahul Gandhi & Nirmala Sitharaman (Photo Credits: ANI/Twitter)

Rafale Deal: राफेल वादावर सध्या भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चांगली जुंपली आहे. या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंवार एकमेकांवर टीका करत असतात. या दोन्ही पक्षात सातत्याने होणाऱ्या वादानंतर एका लहान मुलीने काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांना राफेल विमानाची किंमत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 8 वर्षांच्या मुलीचा हा व्हिडिओ खुद्द संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण (Defense Minister Nirmala Sitharaman) यांनी शेअर केला आहे आणि राहुल गांधींना राफेलची किंमत सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल आभारही मानले आहेत.

8 वर्षांच्या या चिमुकलीने राफेल मुद्द्यावर अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले आहे. यासाठी तिने दोन कंपास पेट्या वापरल्या आहेत. या दोनपैकी एक कंपासपेटी रिकामी असून ती राहुल गांधींची आहे आणि त्याची किंमत 720 कोटी रुपये आहे. तर दुसरी वस्तूंनी भरलेली कंपासपेटी हे मोदींचे राफेल आहे आणि ते कोणत्याही आधुनिक शस्त्रापेक्षा कमी नाही. त्याची किंमत आहे 1600 कोटी रुपये.

तुम्हीही पाहा व्हिडिओ...

अलिकडेच लोकसभेत झालेल्या राफेल डिलवरील चर्चेवर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, "देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा अगदी संवेदनशील असून संरक्षण मुद्द्यातील गोपनियता काँग्रेसने लक्षात घ्यायला हवी."