राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये दिवाळीसाठी खरेदीची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, दिल्ली आणि अनेक शहरांमध्ये हेच चित्र आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्ग वाढतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 17 धावांनी विजय मिळवून पहिल्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवले. आता विजेते पदासाठी त्यांचा मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी दुबई येथे सामना चार वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होईल.

भिवंडी परिसरातील राहणाळ येथील झोपड्यांना आग लागल्याचे वृत्त आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळ पोहोचले असून, आग आटोक्यात आणल्याचे समजते. या घटनेत 4 झोपड्या जळून खास झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. मुख्ताईनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले की, ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं”

हरीयाणामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1,82,804 इतकी जाली आहे. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित झालेल्या 1,64,444 जणांना उपचारानंतर बरे वाटू लागल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे 12 नोव्हेंबर रोजी अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती एम. जगदेश कुमार यांनी दिली आहे.

इंद्रधनुष्य (Rainbow ) दिवे, एलईडी दिवे, स्ट्रिंग लाइट्स, मेटल शेडो लाइट्स, 'कंगन' दिवे, 'झुमर' दिवे यासाठी चांगली मागणी आहे. या दिव्यांच्या किमती 50-450 रुपयांंपर्यंत असतात. हस्तनिर्मित दिवे 50 to Rs 250 रुपयांपर्यंत आहेत. मात्र यावर्षी आकाश कंदीलला जास्त मागणी नाही असे सजावटीच्या एका दुकानदाराने म्हटले आहे

आमच्या दोघांच्या मध्ये येशील तर तिला पेट्रोल टाकू जाळून टाकेल अशी धमकी हुल्लडबाज तरुणाने एका युवतीच्या भावाला दिली आहे. हा प्रकार अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे भूमिपूजन,हिंदुहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे मैदानावर उभारलेल्या कोविड रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

राजस्थानमधील गुर्जर आणि पंजाबमधील किसान आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. या आंदोलनमुळे पश्चिम रेल्वेला आणखी काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ट्विट-

 

Load More

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून अमेरिकेत सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहे. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरीस उप राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूका पार पडल्या. त्यानंतर सलग 4-5 दिवस मतमोजणी सुरु होती. त्यामुळे साहजिक संपूर्ण जगाची उत्कंठता वाढली होती. आज अखेर व्हॉईट हाऊसला नवा सत्ताधीश मिळाला आहे. त्यानंतर संपूर्ण जगभरातून जो बायडन आणि कमला हॅरीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, ते 20 जानेवारी 2021 रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

दरम्यान, काल बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या. याची मतमोजणी 10 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान, विविध टीव्ही वाहिन्यांचे एक्झिट पोल हाती आले आहेत. परंतु, जनतेचा कौल नेमका कोणाला आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

आज 8 नोव्हेंबर मराठी साहित्यातील दिग्गज लेखक पु.ल. देशपांडे यांची 101 वी जयंती. यानिमित्ताने गुगलने खास डुडल साकारत भाईंना मानवंदना दिली आहे. विशेष म्हणजे आजपासून पु.ल. साहित्य ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. त्यामुले पुल आणि साहित्यप्रेमींसाठीही मोठी पर्वणीच असणार आहे.