7th Pay Commission | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet expansion) जोरदार चर्चा सुरु आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला खुशखबर मिळेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. दरम्यान, या उत्सकतेसोबतच केंद्रीय सेवेत असलेल्या विद्यमान आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्येही उत्सुकता आहे. त्यांचीही उत्सुकता संपून लवकरच त्यांना खूशखबर मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकित महाागाई भक्ता (Dearness Allowance) म्हणजेच डीए (DA) आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता (Dearness Relief) म्हणजेच (DR) याबाबत आज (7 जुलै) काही घोषणा होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडत आहे. या बैठकीत यावर नर्णय होऊ शकतो.

केंद्रीय अर्थमंत्रालय आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभाग (DoPT) यांच्यात 26 आणि 27 जून दरम्यान एक बैठक नुकतीच पार पडली. या बैबैठकीत डीए आणि डीआरचा लाभ यावर्षी सप्टेंबरपासून पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सरचिटणीस (DoPT) शिवगोपाल मिश्रा हे देथील या बैठकीस उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यावेळी शिवगोपाल मिश्रा यांनी दिली होती.

शिवगोपाल मिश्रा यांनी त्यावेळी झालेल्या बैठकीत मान्य केले होते की, महागाई

भत्ता आणि डीआरचे तीन थकीत हप्ते सप्टेंबर 2021 मध्ये देण्यात येतील. यात जुलै आणि ऑगस्ट 2021 महिन्याची थकबाकीही समाविष्ट असेल. शिवगोपाल यांनी म्हटले होते की, केंद्रीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या लाभापासून दूर ठेवले तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.