Accident during Republic Day celebrations | (Photo courtesy: According to news reports and news agencies from the media, edited and representative images)

पूर्वांचल येथील मऊ ( Mau) आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूर (Ghazipur) जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला (Republic Day Event ) दोन वेगवेगळ्या घटनांमुळे गालबोट लागले. ध्वजारोहन करताना ध्वजस्थंभात (झेंड्याची काठी) विद्युत प्रवाह (Electric current) उतरल्याने मुख्याध्यापकाहसह काही विद्यार्थी जखमी झाले. मऊ जिल्ह्यातील कहिनौर गावात एमएसडी शाळेत ध्वाजारोहणाची तयारी करताना ही घटना आज (26 जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास घडली. तर, अशाच प्रकारची दुसरी घटना गाजीपूर जिल्ह्यातील कासिमाबाद परिसरातील न्यू मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये घडली.

दोन्ही घटनांबाबत प्राप्त माहिती अशी की, माता संजाफी देवी सिमिती कहिनौर येथे शनिवारी सकाळी ध्वजारोहणाची तयारी सुरु होती. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत पोहोचले रहोते. शाळेत ध्वाजारोहणाची तयारी अंतिम टप्प्या आली होती. ध्वजारोहनासाठी लोखंडी पाईप (रॉड) आणण्यात आला होता. याच रॉडचा ध्वजस्तंभ म्हणून वापर करण्यात येणार होता. ध्वजस्तंभ म्हणून उभारण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पाईप वर उचलला. मात्र, हा पाईप विद्युत खांबाच्या तारांना लागला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर पाईपमधून तब्बल 11 हजार वोल्टचा विद्युत प्रवाह पाईपमध्ये उतरला. यात मुख्याध्यापकांसह दोन विद्यार्थी जखमी झाले.

आदित्या (वय 8 वर्षे, इयत्ता दुसरी), सचिन (वय 10 वर्षे, इयत्ता तिसरी), सामवत (वय 12 वर्षे, इयत्ता सातवी) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. विद्यार्थ्यांच्या बचावासाठी धावलेले मुख्याध्यापक विद्याधर (वय 35 वर्षे) यांनाही वीजेचा धक्का बसला. त्यामुळे तेही जखमी झाले. जखमी विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राष्ट्रगितासाठी रांगेत उभे राहीलेले इतर विद्यार्थी या अपघातातून बालंबाल बचावले. सर्वांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. (हेही वाचा, राजधानीत दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, राजपथावर संचलन, भारताच्या लष्करी सामर्थ्याचे जगाला दर्शन)

दरम्यान, दुसरी घटना गाझीपूर जिल्ह्यातील कासिमाबाद येथे घडली. ग्राम पंचायत सुकाहा हद्दीतील न्यू मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरदार सुरु होती. दरम्यान, इथेही ध्वजारोहनासाठी आणलेला लोखंडी पाईप विद्युत तारांना चिकटल्याने मिर्जापूर गावचा रहिवासी असलेला अमन कुमार खरवार यांचा मुलगा राजेश कुमार खरवार (वय 16 वर्षे) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वाराणसी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.