Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
16 minutes ago

झारखंड येथे आज आणखी 179 कोरोनाबाधितांची नोंद, 2 मृत्यू; 7 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Dec 07, 2020 11:45 PM IST
A+
A-
07 Dec, 23:45 (IST)

झारखंड येथे आज आणखी 179 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट-

 

07 Dec, 23:06 (IST)

आसाम येथे कोरोनाचे आणखी 166 रुग्ण आढळले अ,ून 131 जणांना डिस्चार्ज  दिला गेला आहे.

07 Dec, 22:56 (IST)

तेलगू अभिनेत्री विजयाशांती हिने भाजप पक्षात प्रवेश केल्याचा आनंद व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

07 Dec, 22:48 (IST)

मध्य प्रदेशात कोरोनाचे आणखी 1307 रुग्ण आढळले असून 10 जणांचा बळी  गेला आहे.

07 Dec, 22:35 (IST)

भारत बायोटेककडून कोरोनावरील लस Covaxin च्या आपत्कालीन वापराच्या अधिकृतीतेसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना अर्ज  केला आहे.

07 Dec, 22:31 (IST)

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना ओडिसा काँग्रेसचे आमदार यांच्याकडून कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे.

07 Dec, 21:55 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10:45 वाजता इंडिया मोबाइल कॉंग्रेसला संबोधित करणार आहेत. ट्विट-

 

07 Dec, 21:29 (IST)

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात कत्तलखान्यात बैल घेऊन गेलेल्या एका व्यक्तीला लोकांनी पकडले आणि मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट- 

 

 

07 Dec, 20:58 (IST)

कृषी कायद्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 20 शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. ट्विट- 

 

07 Dec, 20:19 (IST)

8 डिसेंबर रोजी संभाव्य अडचणीमुळे विमानतळावर पोहोचण्यास असमर्थ असणार्‍या प्रवाश्याचे पैसे परत केले जाणार आहेत, अशी घोषणा एअर इंडियाने केली आहे. ट्विट-

 

Load More

भारतामध्ये मागील 8-10 दिवसांपेक्षा अधिक काळापासून देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरूद्ध एकवटले आहेत. सध्या सिंधू बॉर्डरवर एकत्र जमून ते आंदोलन करत आहेत. पंजाब , दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा या प्रांतामधून शेतकरी बॉर्डरवर जमून आपली एकजूट दाखवत आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सिंधू बॉर्डरवर जाऊन आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची भेट घेणार आहेत. दिल्ली सरकार मधील अन्य मंत्री देखील भेटीला जाणार आहेत. शेतकर्‍यांसाठी बॉर्डरवर केलेल्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत.

सध्या केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सारे विरोधक देखील एकवटले आहेत. 8 डिसेंबर दिवशी या कृषी कायद्याविरोधात आवाज तीव्र करण्यासाठी शेतकर्‍यांनी भारत बंद चा नारा दिला आहे. महाराष्ट्रातूनही शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान भारतामध्ये अजूनही कोरोनाचं संकट घोंघावत असल्याने आता लसीकरणासाठी लवकरात लवकर लस बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. युके मध्ये फायझरच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर नुकतीच त्यांनी भारतामध्येही तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर आता Serum Institute of India कडून देखील emergency use authorisation साठी अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.


Show Full Article Share Now