कोरोना व्हायरसमुळे फ्रान्स येथील मृतांचा आकडा 10 हजाराच्या वर; 7 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Apr 07, 2020 11:42 PM IST
जगभरासोबतच भारतामध्येही कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. देशामध्ये वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही सध्या चिंतेची बाब आहे. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सध्या अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान आहे. अशामध्ये अमेरिकेकेकडून भारताकडे Hydroxychloroquine या औषधाची मागणी होत आहे. काल मीडीयाशी बोलताना ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालं आहे. भारत-अमेरिका व्यापार संबंध चांगले आहेत. भारताने औषध दिले तर ठीक नाही दिल्यास त्याला जसाच तसे उत्तर भविष्यात मिळू शकते असा निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये काल 24 तासामध्ये 1150 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
युकेमध्ये पंतप्रधान Boris Johnson यांची कोरोना चाचणी यशस्वी आल्यानंतर आठवडाभरानंतर त्यांना काल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये काल खबरदारीसाठी आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर चीनमध्ये काल दिवसभरात एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान देशातील स्थितीपाहून हा लॉकडाऊन वाढवला जाणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. यामुळे 14 नंतर राज्यातील लॉकडाऊन शिथिल होईल असा समज कुणी करू नये असेही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.