Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

वरावर राव यांना आज नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज ; 6 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Mar 06, 2021 11:56 PM IST
A+
A-
06 Mar, 23:56 (IST)

वरावर राव यांना आज नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

06 Mar, 23:42 (IST)

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 40 उमेदवारांची यादी जाहीर केली.

06 Mar, 23:40 (IST)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस सुरेश जोशी यांनी आज कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतला.

06 Mar, 23:23 (IST)

केंद्र व उत्तर प्रदेश सरकारने मच्छीमार समुदायाला सरकारी नोकरीत आरक्षण दिले नाही तर कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन छेडले जाईल, असे निषाद पक्षाने सांगितले आहे.

06 Mar, 22:30 (IST)

खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरणासाठी लोकसभा सचिवालय संसद भवन वैद्यकीय केंद्रात कोविड-19 लसीकरण केंद्र स्थापन केले जाणार आहे. राष्ट्रीय तज्ज्ञ समूहाने दिलेल्या निर्देशानुसार 9 मार्चपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

06 Mar, 22:18 (IST)

उद्या मुंबईमध्ये लसीकरण मोहीम राबवली जाणार नसल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

06 Mar, 21:41 (IST)

गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील लोकांना राजस्थानमध्ये प्रवेश करण्यासाठी नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहेः राज्य गृह विभाग

06 Mar, 21:41 (IST)

गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील लोकांना राजस्थानमध्ये प्रवेश करण्यासाठी नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहेः राज्य गृह विभाग

06 Mar, 20:38 (IST)

BKC मधील जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 वर्षांच्या आजींनी लस घेतल्यानंतर  वाढदिवस साजरा केला आहे.

पहा व्हिडिओ:

06 Mar, 20:13 (IST)

Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 10,187 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6,080 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एकूण रुग्णसंख्या: 22,08,586

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 20,62,031

मृतांचा आकडा: 52,440

सक्रीय रुग्ण: 92,897

 

Load More

मुंबईत (Mumbai) मध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न करणार असल्याचे खोटं सांगून एका टीव्ही अभिनेत्रीवर आरोपीने अनेकदा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने ओशिवरा पोलिस स्टेशनात (Oshiwara Police Station) नोंदवली आहे. या आरोपीने आपल्यावर अनेक ठिकाणी अनेकदा बलात्कार केला असल्याचे अभिनेत्रीने आपल्या FIR मध्ये सांगितले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी FIR नोंदविला असून या घटनेचा अधिक तपास करत आहे. याप्रकरणी IPC कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस चौकशी सुरु आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यात काल, शुक्रवारी 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे, असं टोपेंनी सांगितलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तसेच नागपूरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 मार्चपर्यंत घालण्यात आलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत 14 मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहे.


Show Full Article Share Now