Live
कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकर्यांसाठी हरियाणा सरकार वैद्यकीय शिबिराचे आयोजन करणार; 6 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE,
बातम्या
Chanda Mandavkar
|
Dec 06, 2020 11:30 PM IST
देशभरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महापरिनिर्वाण दिन अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट मध्ये मोदी यांनी असे म्हटले आहे की, बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचा आदर्श हा कोटी लोकांना बळ देतो. आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हटले आहे.
आज सुद्धा शेतकऱ्यांकडून सिंघु बॉर्डवर आंदोलन करण्यात येणार आहे. फार्म बिलाच्या विरोधात सुरु असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आमच्या मागण्यांबद्दल सरकराने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवानांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. तर 5 डिसेंबर नंतर काल केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर पुन्हा बैठक येत्या 9 डिसेंबरला होणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर दादर मधील चैत्यभुमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी येत बाबासाहेबांना वंदन केले आहे. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता बाबासाहेबांच्या अनुयायांना चैत्यभुमीवर पत्र पाठवून त्याच्या माध्यमातून अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.