ओडिशातील बहरामपूर जंगलातील मंदिरात 10 फूच लांबीचा किंग कोब्रा प्रजातीचा साप आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सापाला पकडून जंगलात सोडले.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पेडर रोड येथे मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी  मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

गिरीशचंद्र मुर्मू यांची नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून नियुक्ती (CAG) झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. काल त्यांनी जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून राजीनामा दिला होता.

पुणे शहरात आज नव्याने 1,440 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 62,037 झाली आहे. तर 1,196 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 16,975 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,02,945 झाली असून आज 5,208 टेस्ट घेण्यात आल्या.

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने भारत सरकारशी संपर्क साधल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे.

श्रीलंकेतील निवडणुकीत महिंद्र राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे राजपक्षे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बिहारमध्ये महापूर आला असून अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. सुमारे 21 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जम्मू कश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. हा हल्ला नेमका बालकोट येथील मेंढर भागात झाला.

मुंबई शहरात आज दिवसभरात दिवसभरात 910 कोरोना रुग्णांची नोंद तर 57 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1,20,165 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 11,514 रुग्ण आढळून आले असून 316 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 4,79,779 वर पोहचला आहे.

Load More

मुंबई मध्ये सलग तिसर्‍या दिवशी पावसाचं धुमशान सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल संध्याकाळच्या सुमाराला जोरदार वारा आणि पाऊस बरसल्याने अनेक ठिकाणी पत्रे उडाले आहेत. सखल भागात राहणार्‍या वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासून मुंबईमध्ये रिमझिम पाऊस बरसत आहे.

मुंबईमध्ये मागील दोनच दिवसात ऑगस्ट महिन्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी वृष्टी नोंदवण्यात आली आहे. यामुळे तलावक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे विहार तलावदेखील आता पूर्ण क्षमतेने वाहण्यास सुरूवात झाली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गिरीश चंद्र मुर्मू यांचा राजीनमा स्वीकारल्यानंतर आता जम्मू कश्मीर मध्ये आता मनोज सिन्हा हे नवे उपराज्यपाल असतील. अशी घोषणा केली आहे. दरम्यान आज सकाळी अहमदाबाद येथे श्रेय हॉस्पिटलमध्ये आज सकाळी आग लागल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे.